मनुच्या अंधारातून भीमाच्या प्रकाशाकडे नेणारी कविता
“मनुच्या अंधारातून भीमाच्या प्रकाशाकडे नेणारी कविता…” ✒️ कविता : स्वलिखित | वैचारिक प्रेरणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर © सर्व हक्क लेखकाकडे राखीव काळी रात्र ती मनुची, जिथे स्त्रीला स्थान नव्हते, माणूस म्हणून जगण्याचे, तिला कोणतेच भान नव्हते. चितेवर चढवून तिचे, अस्तित्व त्यांनी जाळले, पण माझ्या भीमाने गड्या, तिचे नशीबच बदलले! "फेकून द्या त्या बेड्या", गर्जला माझा भीमराव, स्त्रीच्या सन्मानासाठी घातला, कायद्याचा घाव. हिंदू कोड बिलाने दिला, तिला बापाचा हिस्सा, जगाला कळला मग, माझ्या भीमाचा किस्सा! आज ती वाघिण होऊन, संसदेत धाडते, पुरुषांच्या बरोबरीने, जगावर राज्य मांडते. जळायचं ते दिवस गेले, आता ती पेटून उठते, भीमाच्या एका कायद्यामुळे, ती आभाळ कवेत घेते . मनुच्या अंधारातून भीमाच्या प्रकाशाकडे : एका वैचारिक कवितेचे विश्लेषण प्रस्तावना मराठी व हिंदी साहित्यपरंपरेत कविता ही केवळ सौंदर्याची अभिव्यक्ती नसून सामाजिक वास्तव मांडणारे आणि परिवर्तनाची दिशा दाखवणारे प्रभावी माध्यम राहिले आहे. “मनुच्या अंधारातून भीमाच्या प्रकाशाकडे” असा आशय असलेली कविता सामाजिक विषमता, जात...